Available in Marathi This information is published by the Gram Panchayat in Marathi. An English version is not available yet.
तुम्हाला कशासाठी योजना हवी आहे ते निवडा; उपयुक्त ठरू शकणाऱ्या योजना आणि त्यांचे अधिकृत संकेतस्थळ मिळेल. येथे पात्रता ठरवली जात नाही.
हे मार्गदर्शक काय करते?
तुम्ही घर, शेती, शिक्षण, महिला व बालके, रोजगार, सामाजिक सहाय्य, दिव्यांग किंवा आरोग्य यांपैकी विषय निवडता. त्या विषयातील योजना, त्यांची सर्वसाधारण ओळख आणि अधिकृत संकेतस्थळाचा दुवा येथे दिसतो. तुम्ही कोण आहात (शेतकरी, विद्यार्थी, महिला इ.) हे ऐच्छिकपणे निवडल्यास जुळणाऱ्या योजना वर दिसतात.
काय लक्षात ठेवावे?
- ही यादी फक्त उपयुक्त ठरू शकणाऱ्या योजना सुचवते. तुम्ही पात्र आहात किंवा नाही ते योजनेच्या अधिकृत माहितीनुसार ठरते.
- अर्ज ग्रामनेत्रवर स्वीकारले जात नाहीत. अर्ज अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित कार्यालयात करावा.
- तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली किंवा साठवली जात नाही; तुमची निवड फक्त पानाच्या पत्त्यात असते.
- जेथे “अजून तपासलेले नाही” असे लिहिले आहे तेथे अधिकृत पान ग्रामनेत्रने अजून तपासलेले नाही; माहिती अधिकृत पानावरच खात्री करा.
योजनेसाठी कोणालाही अनधिकृत पैसे देऊ नका. पैशांची मागणी झाल्यास तक्रार नोंदवा.
Official links
Also read
- Available in MarathiArticle
शासकीय योजनांची माहिती कुठे मिळेल?
योजनेची खरी माहिती, पात्रता आणि अर्जाची पद्धत अधिकृत ठिकाणांवरून मिळते. ती कुठे पाहायची आणि कशाची काळजी घ्यायची ते येथे आहे.
- Available in MarathiChecklist
ग्रामसभेत विचारायचे प्रश्न: तपासणी यादी
निधी, कामे, लाभार्थी आणि तक्रारींबद्दल ग्रामसभेत कोणते प्रश्न विचारता येतात. प्रत्येक गटाखाली तुमच्या ग्रामपंचायतीची संबंधित माहिती पाहण्याची जोड आहे.